Viveki Katta

By: Amit Karkare
  • Summary

  • एखाद्या गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे मार्ग दाखवणारे, तुमचे आमचे सर्वांचे प्रश्न सोडवणारे, एकमेकांच्या अनुभवातून चार गोष्टी शिकवणारे, थोडक्यात रोजच्या जगण्याला विवेकाची फोडणी देणारे विचार. अजूनही बरंच काही होऊ शकेल… जसंजसं सुचेल तसतसं गोळा करु या कट्ट्यावर… शेवटी हेतु एकच आहे… आपले रोजचे जगणे साधे सोपे करणे.
    Amit Karkare
    Show more Show less
Episodes
  • थिंकींग, फास्ट & स्लो - पुस्तक कट्टा
    Jan 29 2025

    मनाचा गूढसोपेपणा उलगडून टाकणारं पुस्तक म्हणजे नोबेल विजेते डॅनियल काह्नमन यांनी लिहीलेले - थिंकींग, फास्ट & स्लो.

    आपले मन हा एक गूढ पेटारा आहे… गेल्या हजारो वर्षात मानवाने प्रचंड प्रगती केली, निरनिराळे शोध लावले, अशक्य अशा गोष्टी साध्य केल्या पण अजूनही मनाचा गुंता आपल्याला समजला आहे असं ठामपणे म्हणता येणार नाही. आपल्यापैकी प्रत्येकाची विचार करण्याची एक स्वतंत्र शैली आहे, पण तरिही सायकोलॉजीच्या अभ्यासकांनी मन समजून घेण्याचे काही पॅटर्न्स शोधून काढलेच आहेत ज्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाचे मन थोड्याफार प्रमाणात समजून घेणे जमू लागले आहे… आपण विचार कसा करतो, निर्णय कसे घेतो, एखाद्या घटनेकडे कोणकोणत्या दृष्टीकोनातून बघतो, आणि या सगळ्याचा आपल्या विचार व भावनांवर कसा परीणाम होतो या वर चर्चा करणार्‍या या पुस्तकाबद्दल आपण समजून घेणार आहोत आजच्या या पुस्तक कट्ट्यावर.


    #PustakKatta #MarathiPodcast #BookSummary #BookDiscussion #ThinkingFastAndSlow #DanielKahneman #CognitiveBias #DecisionMaking #BehavioralScience #CriticalThinking #PsychologyOfThinking #BehavioralEconomics #MentalModels #ThinkBetter #RationalThinking #marathi #podcast #dramitkarkare

    Show more Show less
    15 mins
  • डोपामीन डीटॉक्स - पुस्तक कट्टा
    Jan 17 2025

    तुम्हाला आपण आपल्या हातातल्या स्मार्टफोनच्या आधीन झालोय असं वाटतं का ? पूर्वीपेक्षा आपली वैचारीक एनर्जी कमी झाली आहे आणि आता पुस्तकाची काही पानं वाचली की दमायला होतं असं वाटतं का ? सतत काहीतरी घडायला हवं - स्क्रोल करायला हवं असं वाटत राहतं का ? आणि पुन्हा एकदा पूर्वीचे शांत, संतुलीत, लक्षपूर्ण आणि कार्यक्षम आयुष्य परत मिळावसं वाटत असेल तर डॉ कॅमेरुन सेपाह यांनी लिहीलेलं डोपामीन डिटॉक्स हे पुस्तक तुमच्याच साठी आहे.


    #DopamineDetox #SelfImprovement #MindsetReset #MentalHealth #Focus #Productivity #IntentionalLiving #Neuroscience #DigitalMinimalism #Marathi #PustakKatta #podcast

    Show more Show less
    10 mins
  • द अल्केमिस्ट - पुस्तक कट्टा
    Jan 9 2025

    आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण सगळेच खरं तर कस्तुरीमृग असतो, आपण सुख, समाधान, आणि शांती यांचा शोध बाहेरच्या जगात घेत असतो, पण ते सगळे आपल्या आतच असते. आपल्या आतले गुण, शक्ती, आणि आत्मविश्वास ओळखणे हीच खरी जीवनाची प्रक्रिया आहे. अगदी हीच कथा आहे पाउलो कोएल्हो लिखीत ‘द अल्केमिस्ट’ या पुस्तकाची.


    #PodcastMarathi #PustakKatta #TheAlchemist #PauloCoelho #BookSummary #Inspiration #LifeJourney #FollowYourDreams #BookLovers #MarathiPodcast #Wisdom #DreamsToReality #Motivation #पुस्तककट्टा #अल्केमिस्ट #प्रेरणा #स्वप्नपूर्ती #MarathiBooks



    Show more Show less
    6 mins

What listeners say about Viveki Katta

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.